२६ वर्षीय तरुणाने संपवली जीवनयात्रा, जामखेड तालुक्यात हळहळ

Spread the love

जामखेड : तालुक्यातील राजेवाडी येथील २६ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) सकाळी बावी गावच्या शिवारात उघडकीस आली. महेश बिभिषण कुमटकर (वय २६, रा. राजेवाडी, ता. जामखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने जामखेड तालुक्यासह राजेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बावी गावच्या शिवारातील एका शेतात गळफास घेऊन महेश कुमटकर या तरूणाने जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली. त्याला तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

याप्रकरणी मृत महेश कुमटकर यांचे मामा रामा नवनाथ गोरे (रा. राजेवाडी) यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेशच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची पार्श्वभूमी व कारणांचा तपास जामखेड पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, तरुण वयातील महेशच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीय व नातेवाइकांना मोठा धक्का बसला असून, राजेवाडी व बावी परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment