जामखेडमध्ये खळबळ! म्हाडा कॉलनीत पुण्यातील २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला

Spread the love

जामखेड: शहर परिसरातील म्हाडा कॉलनी येथे एका २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. अनिकेत बेंजामिन निमगावकर (वय २९, रा. जे.पी. हाइट्स, मुनुरवार हाऊसिंग सोसायटी, वडगाव शेरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत निमगावकर हा २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान म्हाडा कॉलनी परिसरात मृतावस्थेत आढळून आला. तरुणाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व कोनांतून तपास करत आहेत.

या घटनेबाबत सुरेश भास्कर निमगावकर (वय ७३, रा. कोल्हेमळा, जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात माहिती दिली. दिलेल्या खबरीवरून शनिवारी दुपारी १.१४ वाजता जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (भा.ना.सु.सं.) २०२३ च्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ६८/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक फौजदार शिवाजी कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून ते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.

Leave a Comment