जामखेड हादरलं! कुख्यात गुंड सागर मोहळकरवर गोळीबार

Spread the love

जामखेड: जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकर याच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोहळकर परिसरातून जात असताना अचानक हल्लेखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून फरार झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मोहळकरवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असून, हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

(टीप: बातमी अपडेट होत आहे.)

Leave a Comment

error: