रोहित पवार यांच्या सुरक्षेवरून राजकीय वातावरण तापले; ‘झेड प्लस’ सुरक्षा द्या, अन्यथा… तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांचा थेट इशारा

Spread the love

जामखेड : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी ठाम भूमिका मांडली आहे. दिवंगत नेते Ajit Pawar यांच्या निधनाबाबत घातपाताची शक्यता असल्याचा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी मुंबई व दिल्लीतील पत्रकार परिषदांमध्ये अभ्यासपूर्ण आणि स्पष्टपणे मांडला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत गोलेकर यांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

गोलेकर म्हणाले, “अजित दादांसारख्या मोठ्या नेत्याविरुद्ध जर घातपात झाला असेल, तर त्या मागील शक्ती अत्यंत प्रभावशाली असू शकतात. रोहित दादांनी धाडसाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळे त्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी आमची ठाम भूमिका आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जो प्रश्न आहे, तोच रोहित दादांनी मांडला आहे.”

ते पुढे म्हणाले, “मी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एक सामान्य कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून शासनाकडे मागणी करतो की, रोहित दादांना तातडीने ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा द्यावी. सत्य मांडणाऱ्या नेतृत्वाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.”

सरकारने सुरक्षा न दिल्यास राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेतील, असा इशाराही त्यांनी दिला. “साधारण १५ निर्भीड तरुण कार्यकर्त्यांची टीम तयार आहे. दोन दिवसांच्या रोटेशन पद्धतीने २४ तास संरक्षणाची जबाबदारी स्वीकारू. राज्यभरातून कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. आम्ही रोहित दादांचा कवच आणि ढाल म्हणून उभे राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले. या स्वयंप्रेरित सुरक्षा व्यवस्थेसाठी आमदार रोहित पवार यांनी परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीमुळे जामखेड तालुक्यासह राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, रोहित पवार यांच्या सुरक्षेचा मुद्दा आता अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन येथे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्याकडे निवेदन सादर केले.यावेळी श्रीकांत लोखंडे, वैभव जमकावळे, मदन पाटील, चंद्रकांत गोलेकर, गोवर्धन गायकवाड, गणेश जगताप, बिभीषण परकड, रामहरी गोपाळघरे, प्रकाश गोलेकर, रविराज गायकवाड, मोहन भोसले, बाळासाहेब सुळ, राजेंद्र जाधवर, हनुमंत बारगजे, शाम सकट, दत्तात्रय भोसले, राम शिंदे, प्रल्हाद गिते, मुकुंद गोलेकर, अशोक खटावकर, दिपक जावळे, रामहरी जायभाय, सुहास पाटील, संदिप शिकारे, संदिप बिरंगळ, दत्तराज पवार, हरीदास गोलेकर, गोकुळ गोलेकर, मोहन सुरवसे, संतोष लष्करे, सिताराम जावळे, बब्बू शेख, हनुमंत गोलेकर, धनंजय गोलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: