जामखेड हादरले! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; शहरात १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

Spread the love

फक्राबादमध्ये केमिकल मिसळून दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ

जामखेड| जामखेड शहर व तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले असून फक्राबाद येथे केमिकल मिसळून दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जामखेड शहरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत संशयिताकडून अंदाजे १० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. संबंधित व्यक्तीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, तालुक्यातील फक्राबाद येथे सुरू असलेल्या दूध भेसळ प्रकरणावरही पोलिसांनी धडक कारवाई केली. केमिकल व इतर पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, यात अनेक बेड मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

(टीप: बातमी अपडेट होत आहे.)

Leave a Comment

error: