अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत: ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात

Spread the love

जामखेड|अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाच्या ९ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी (सर्व प्रवर्गातील महिलांसह) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी निश्चित करण्यात आले आहे. एकूण १३ पदे सभापतीसाठी आरक्षित करण्यात आली आहेत, त्यातील तपशील असे आहे:

अनुसूचित जाती – १ पद

अनुसूचित जाती (महिला) – १ पद

अनुसूचित जमाती (महिला) – १ पद

नागरिकांचा मागास प्रवर्ग – २ पदे

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – २ पदे

सर्वसाधारण – ३ पदेसर्वसाधारण (महिला) – ३ पदे

उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी नागरिकांना आरक्षण सोडत बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

error: