गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नान्नजच्या नंदादेवी शाळेचा झेंडा, ‘माझी शाळा, स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक

Spread the love

जामखेड : मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नान्नज येथील नंदादेवी माध्यमिक विद्यालयाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून तीन लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. विद्यालयाच्या सर्वांगीण विकास आणि उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेत हा मान प्राप्त झाला.

गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्राचार्य गोरक्षनाथ रेपाळे, पर्यवेक्षक दादासाहेब पाटील आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोकूळ ढेपे यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमादरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी खताळ, केंद्रप्रमुख राम निकम आणि केंद्रप्रमुख सुरेश मोहिते यांचीही उपस्थिती होती.

विद्यालयात परसबाग, स्वच्छता, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण, भव्य क्रीडांगण यांसह सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. विविध स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सध्या विद्यालयात ११५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यापैकी ६०० मुले आणि ५५० मुली आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता आणि अनुशासन यासाठी शाळेने सातत्याने कार्य केले आहे.

या यशाबद्दल जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश मुळे, संस्थेचे विश्वस्त, स्कूल कमिटी सदस्य आणि ग्रामस्थांनी नंदादेवी माध्यमिक विद्यालयाचे अभिनंदन केले.

तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आदर्श ठरलेल्या या विद्यालयाची ही मोठी कामगिरी असून इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Leave a Comment

error: