जामखेड: जामखेड तालुक्यातील राजकारणात उत्सुकतेचा शिखरबिंदू गाठणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज अखेर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. तिन्ही गटांतील आरक्षण ठरल्याने अनेकांचे राजकीय भवितव्य निश्चित झाले, तर काहींची स्वप्ने चुरगळली. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पारदर्शक लॉटरी पद्धतीने ही सोडत पार पडली.
जामखेड तालुक्यातील गटनिहाय आरक्षण स्थिती खालील प्रमाणे
जवळा गट – ओबीसी महिला
साकत गट – सर्वसाधारण
खर्डा गट – सर्वसाधारण