जामखेड: जामखेड तालुक्यातील पंचायत समितीनिवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे! अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आज विराम मिळाला, कारण सदस्यपदांच्या जागांसाठीची आरक्षण सोडत आज अधिकृतपणे जाहीर झाली. सभापती पदाचे आरक्षण काही दिवसांपूर्वी निश्चित झाल्यानंतर आज सदस्यपदाच्या ६ गणांतील आरक्षण यादी जाहीर होताच, तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
सकाळपासूनच राजकीय कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार पंचायत समिती कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोडत जाहीर होताच काहींच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. आता पुढील निवडणूक रणधुमाळीचा काउंटडाउन सुरू झाल्याचे चित्र आहे.
गणनिहाय आरक्षण यादी खालील प्रमाणे
जवळा : अनुसूचित जाती महिला
अरणगाव : ओबीसी महिला
दिघोळ – सर्वसाधारण महिला
साकत – सर्वसाधारण
खर्डा – सर्वसाधारण
शिऊर- सर्वसाधारण