जामखेड: धनेगावात जीवावर बेतलेला थरार; पूराचा घेरा फोडून ढाळे कुटुंबाची प्रशासनाने केली सुटका

Spread the love

जामखेड | तालुक्यातील धनेगाव येथे सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) रोजी पहाटे आलेल्या पुराच्या पाण्यात ढाळे कुटुंब अडकले होते. घराभोवती पाणी साचल्याने बाहेर पडणे अशक्य झाले होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू करून कुटुंबाची थरारक सुटका केली.

सदर कुटुंबातील बाळासाहेब रंगनाथ ढाळे, रंगनाथ ढाळे, मंगल बाळासाहेब ढाळे आणि बाबुराव बाळासाहेब ढाळे यांना प्रशासनाने सकाळी साधारण १२ वाजता पाण्यात वेढलेल्या घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले. विशेष म्हणजे या सोबत त्यांच्याकडील चार शेळ्या व एक वासरू यांचीही सुरक्षित सुटका करण्यात आली.

स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथकाच्या समन्वयातून झालेल्या या बचावकारवाईमुळे ढाळे कुटुंबांनी सुटकेचा निश्वास टाकला. गाव परिसरात अजूनही नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे धोक्याची स्थिती कायम आहे. नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: