जामखेड: राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज (२९ ऑगस्ट) राज्यातील तब्बल २८ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट तर घाटमाथा परिसरातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तास नागरिकांनी सावधान राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा, असे स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसामुळे जलसाठा वाढ, वाहतुकीत अडथळे आणि पूरस्थिती उद्भवू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा पावसाच्या तडाख्यात
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड – या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. लातूर, धाराशिव – हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज.
कोकणात सतर्कतेचा इशारा
मुंबई – मध्यम पाऊस.पालघर, ठाणे – वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – मुसळधार पावसाची शक्यता.
पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर – हलका ते मध्यम पाऊस. पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा – मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज.
उत्तर महाराष्ट्रावर ढगांची सरबत्ती
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर – विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. नाशिक घाटमाथा – मुसळधार पावसाचा धोका.
विदर्भात गडगडाटी पाऊस
अकोला, अमरावती – मुसळधार पाऊस, वादळी वारे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ – विजांचा कडकडाट आणि पावसाचा अंदाज.